Me Sahyadri 062025B

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

Me Sahyadri
June 2025
Volume 8, number 2, # 100
Amazing Caralluma adscendens var. fimbriata
Please use minimum 1700 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to my friend Ajey Kelkar and all those who helped me during the compilation and for the help and guidance during the activity.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine.
 

 

““
 
Me Sahyadri – June 2025
 
सह्याद्री च्या डोंगररांगा, जैवविविधतेसाठी ओळखला जातो. गुजरातपासून केरळपर्यंत, उत्तर -दक्षिण पसरलेल्या, सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगेत, उंच डोंगरांवर, कड्यांवर, कपारीत, सड्यांवर, डोंगरउतारावर, पाणथळ ठिकाणांवर, सदाहरित जंगलांत, पानगळीच्या वनात, गवताळ माळरानात अनेक अंतर्जन्य, दुर्मिळ, अदभूत प्राणी, पक्षी आणि वनस्पती आहेत. सह्याद्री दक्षिण भारताचे नंदनवन आहे. मुख्य डोंगरांगेस काटकोनात अनेक उप डोंगररांगा आहेत. यातील काही डोंगररांगा दख्खनच्या पठारावर अतिवृष्टी होणाऱ्या पश्चिमेकडून, पर्जन्यछाया असलेल्या पूर्वेकडे पसरलेल्या आहेत. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या शुष्क पठारी प्रदेशात आणि तेथील डोंगरांवर, पश्चिमेकडील मुख्य डोंगर रांगेच्या तुलनेत वेगळीच जैवविविधता आहे. हा पूर्वेकडील प्रदेश शुष्क असला तरी या भागात सुद्धा अदभूत जैवविविधता आहे. शुष्क कोरडा प्रदेश म्हणजे पडकी जमीन असा सर्वसामान्यांत समज आहे. वास्तव मात्र वेगळे आहे. शुष्क, खडकाळ, वाळवंटी प्रदेशात सुद्धा वेगळी पण खूप महत्वाची आणि भरपूर जैवविविधता आढळते. जागतिक पातळीवर अंदाजे १०-१५ % वनस्पती, १५-१८ % पक्षी, १०-१५ % सस्तन प्राणी, १५-२५ % किटक शुष्क प्रदेशात आढळतात. आपल्या भारत देशात सुद्धा अंदाजे १०-१५ % जैवविविधता शुष्क प्रदेशात आढळते. वाळवंटांमध्ये, शुष्क प्रदेशात कमी प्रजाती असतात मात्र त्यातील बरेच प्राणी, पक्षी, वनस्पती, किटक कठीण परिस्थितींना सामोरे जाऊन त्यांस अनुकूल होऊन विशेषीकृत असतात. घनदाट जंगले तेथील प्रजातींसाठी जेवढी महत्वाची आहेत तेवढीच माळराने, शुष्क वाळवंटे तेथील प्रजातींसाठी महत्वाची आहेत. पुणे शहराच्या आग्नेय दिशेला, गवताळ शुष्क डोंगरांवरील माळरानांवर, लांडगे, तरस , कोल्हे, उदमांजर, साळींदर, खवले मांजर, बिबटे, मुंगूस, ससे, चिंकारा आणि काळवीट यांचा अधिवास आहे. शहराच्या वेशीवर असलेल्या या डोंगरांना मात्र शहरीकरणाच्या भस्मासुराने वेगाने विळखा घालायला सुरु केले आहे. सस्तन प्राण्यांव्यतिरिक्त येथे अनेक स्थानिक आणि स्थलांतर करून येणारे पक्षी आढळतात. हिवाळ्यात येथे स्टेपी, बोनेलीस, टॉनी, शॉर्ट टोड स्नेक, इत्यादी अनेक प्रकारचे गरुड पक्षी, ससाणे, तित्तर, लावा, चकोर, चंडोल, धाविक, मोर आणि अनेक लहान पक्षी आढळतात. वाळवंटी आणि शुष्क प्रदेशातील वनस्पती, सहजीवनामुळे, येथे राहणाऱ्या मनुष्यप्राण्यास माहिती असतात. मात्र शहरी आणि सरकारी धोरणे आणि नीतीनिर्मात्यांना मात्र याबाबत माहिती नसते. वाळवंटी, शुष्क गवताळ प्रदेश पडीक आणि निरुपयोगी आहे असा बहुसंख्य मनुष्यप्राण्याचा समाज असतो. या शुष्क भागातील एका अद्भुत लहान वनस्पतीची आपण ओळख करून घेऊयात.
The Sahyadri mountain range (western ghat) is known for its biodiversity. Stretching from Gujarat to Kerala, north to south, all along the main Sahyadri mountain range, on high mountains, on ridges, in ravines, on slopes, on wetlands, in evergreen forests, in deciduous forests, in grasslands, is home to many endemic, rare, and unique animals, birds, and plant species. The Sahyadri is the paradise of South India. There are many sub-mountain ranges perpendicular and around the the main ridge. Some of these mountain ranges extend from the western heavy rainfall region to to the eastern rain shadow region of deccan plateau.The dry plateau region and the mountains in east have a different biodiversity compared to the main mountain ridge in the west. Although this eastern region is dry, this area also has amazing and unique biodiversity. There is a common perception that arid and dry regions are barren lands. However, the reality is different. Arid, rocky, desert regions also have different but very important and abundant biodiversity. Globally, approximately 10-15% of plants, 15-18% of birds, 10-15% of mammals, 15-25% of insects are found in arid regions. In our country India, approximately 10-15% of biodiversity is found in arid regions. There are fewer species in deserts and arid regions, but many of them are specialized in adapting to difficult conditions. As dense forests are important for the species there, so are dry deserts. In the southeast of Pune city, on the dry grasslands on the hills, wolves, hyenas, foxes, hyenas, porcupines, civets, leopards, mongooses, rabbits, chinkaras and blackbucks. However, these hills on the outskirts of the city have started to be rapidly destroyed by the uncontrolled madness of urbanization. Apart from mammals, many local and migratory birds are found here. In winter, many types of eagles like steppe, bonelis, tawny, short toad snake, etc., hawks, partridges, larks, coursers, lapwings, sandgrouse, buntings, robins, quails, franklins, peacock and numerous small birds are found here. Due to symbiotic life style with nature, the arid regions plants, are known to the locals living here. However, urban and government policy makers are mostly ignorant about the significance. The majority of urban citizens consider deserts and arid grasslands to be wasteland and useless. Let us learn about a wonderful small plant of this arid region from this very barren landscape.
 

 

““ 
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in north western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group".
 
 

 

 
1. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
शुष्क प्रदेशाचा शेती आणि इतर पाण्यावर अवलंबून असणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या उद्योगांसाठी उपयोग नसला तरी येथील वनस्पती, प्राणी पक्षांचे हा एकुलता अधिवास आहे. पुणे शहराच्या आग्नेय दिशेस असलेला हा सुंदर अधिवास वाढत्या शहरीकरण आणि प्रयोजित विमानतळ प्रकल्पामुळे नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. येथे आढळण्याऱ्या, अदभूत वनस्पतींमध्ये एक लहान वनस्पती आहे. याला संस्कृत मध्ये युग्मफलोत्तम असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि भारतातील इतर राज्यातील शुष्क प्रदेशात ही वनस्पती आढळते. महराष्ट्रातील विविध भागात याला "शिंदळ माकड", "माकड शिंदळी", "शिंदादड माकड", "माकुडे", "रान शिंगोळ्या", "माकड शिंगोळे", "माकड शिंदडी", "तीनधारी निवडुंग", रानसांभर अशी वेगवेगळी नावे आहेत. कन्नड भाषेत या वनस्पतीस "मांगणकोडू" (माकडाचे हात), तेलगू भाषेत "कुंडेलू", "कोंमल्यू" (सशाची शिंग), तामिळ भाषेत "कुल्लेमुलिया", "कालीमूदीयान" अशी नावे आहेत. Caralluma adscendens var. fimbriata, माकड शिंगी हही एक जास्त पाणी नसलेल्या प्रदेशातील, विशेषतः भारतातील दक्षिण-पश्चिम भागातील वनस्पती आहे. या वनस्पती ची अनोखी छटा असलेली मांसल, हिरव्या किंवा राखाडी रंगाची टाके असलेली देठं असतात. या वनस्पतीच्या देठांच्या टोकावर फुले येतात. पाने नसतात. या वनस्पतीमध्ये तारांसारखी लहान फुलं असतात जी सामान्यतः तपकिरी राणी रंगाची असतात आणि त्याला एक विशेष कुजट वास येतो. ही प्रजाती शुष्क परिस्थितीला चांगली अनुकूल आहे आणि ती खडकाळ, वाळवंटी मातीमध्ये कमी पाणी आवश्यक असलेल्या ठिकाणी चांगली वाढते. ही प्रजाति साधारणतः ३० सेंटीमीटर उंचीपर्यंत पोहोचते. या वनस्पतीचा पारंपारिक औषधांमध्ये वापर होतो. विशेषतः भारतात, जिथे त्याचे विविध औषधी गुणधर्म असलेले मानले जाते, त्यात त्याचा उपयोग भूख रोखण्यासाठी आणि त्याच्या संभाव्य सूजनरोधक गुणांसाठी केला जातो. या वनस्पतीला पाणी साठवण्याची क्षमता आहे, ज्यामुळे ती दीर्घ शुष्क हंगामांमध्येही तग धरू शकते. महाराष्ट्राच्या शुष्क प्रदेशात ग्रामीण भागात, या देठांची भाजी केली जाते. माकडशिंगी च्या फुलाचा आकार लहान, ताऱ्या सारखा असतो साधारणतः, फुलं राणी तपकिरी किंवा लालसर रंगाची असतात, प्रत्येक फुलात पाच टोकदार पाकळ्या असतात, आणि केंद्रभागात पंचकोनी आकाराच्या संरचनेत प्रजनन अवयव असतात. या फुलांना एक कुजट वास असतो. हा वास विशिष्ट माश्यांना आकर्षित करतो. फुलं सामान्यतः देठांवर उगवतात आणि उबदार महिन्यांमध्ये उमलतात, पण त्यांचे उमलण्याचे वेळापत्रक पर्यावरणाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकते. फुलांचे आकार साधारणतः २-३ सेंटीमीटर व्यासाचे असतात. पाकळ्यांवर पिवळ्या , तपकिरी रंगाच्या असलेल्या रेघांच्या रचनेमुळे फुले उठावदार दिसतात. पाकळ्यांच्या बाह्य कडांवर तंतू असतात. वारा आला की हे तंतू हलतात.
Although the arid region is not used for agriculture and other water-dependent human activities, and mostly is considered as wasteland, it is not so. It is the only habitat for plants and animals here. This beautiful habitat, located southeast of Pune city, is on the verge of complete destruction due to increasing urbanization and the proposed airport project. Among the amazing plants found here is a small plant. It is called Yugmaphalottam in Sanskrit. This plant is found in the arid regions of Maharashtra and other states of India. In different parts of Maharashtra, it has different names like "Shindal Makad", "Makad Shindali", "Shindadad Makad", "Makude", "Ran Shingolya", "Makad Shingole", "Makad Shindadi", "Tindhari Kakhtung", "Ran Sambhar". In Kannada, this plant has names like "Mangankodu" (monkey's hands), in Telugu "Kundelu", "Komlyu" (rabbit's horn), in Tamil "Kullemuliya", "Kalimudiyan". Caralluma adscendens var. fimbriata is a succulent plant species native to the arid regions of India, particularly in the southwestern parts. It belongs to the Apocynaceae family and is recognized for its unique appearance, which includes fleshy, cylindrical stems that are typically greenish or grayish. The plant has distinctive, frilled edges on its stems, which contribute to the "fimbriata" (fringed) part of its name. It produces star-shaped, small flowers that are usually a dull purple or brownish color, with a characteristic foul odor. This species is well adapted to dry conditions, thriving in rocky, sandy soils with minimal water requirements. It has a relatively low growth habit, typically growing in clumps that can reach 30 cm in height. C. adscendens var. fimbriata is used in traditional medicine, particularly in India, where it's believed to have various therapeutic properties, including its use as an appetite suppressant and for its potential anti-inflammatory effects. The plant is also known for its ability to store water, which allows it to survive long dry spells. Due to its medicinal uses, it has gained some attention in the global market, though overharvesting could pose a risk to its wild populations. The flowers of Caralluma adscendens var. fimbriata are small, star-shaped blooms with a unique and somewhat unusual appearance. Typically, the flowers are dull purple, brown, or reddish in color, giving them an earthy, muted look. The petals of the flower are fleshy and have a waxy texture, which is common among succulent plants. Each flower has five pointed lobes, arranged in a star-like formation, with a central tubular structure that contains the reproductive organs. The blooms are known for their unpleasant odor, which is often compared to rotting meat or decay. This scent attracts specific pollinators, such as certain flies, that are drawn to the smell. The flowers tend to grow in clusters on the stems, often blooming during the warmer months of the year, though the exact timing may vary depending on environmental conditions. The size of the flowers is relatively small, usually not more than 2-3 cm in diameter. Despite their odor and muted colors, the flowers contribute to the plant's distinctive appearance and are an essential part of its reproductive process.
 

 

 
2. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
माकडशिंगीच्या बिया नैसर्गिकरित्या वाऱ्याबरोबर, प्राण्यांच्यामुळे किंवा पाण्याबरोबर पसरतात. शेंगा सुकल्यावर त्यातील हलक्या बिया उघड्या पडतात आणि वाऱ्याबरोबर उडून जातात. बिया सामान्यतः लहान, सपाट असतात. त्यांच्या कडांवर रेशमी पांढरे केस असतात. भारताच्या काही भागांमध्ये आणि दख्खनच्या पठारावर, माकडशिंगी नैसर्गिकरित्या कोरड्या खडकाळ भागात आणि खडकाळ झुडुपांमध्ये वसाहत करतात. पोषकी तत्वे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतेक इतर वनस्पती खडकाळ जमिनीत संघर्ष करतात. माकडशिंगीचे अनुकूलन (संपत्ती, पाणी साठवण आणि CAM प्रकाशसंश्लेषण) त्याला स्पर्धात्मक फायदा देते. खडकाळ अधिवास शेळ्या किंवा गुरांसारख्या शाकाहारी प्राण्यांपासून भौतिक संरक्षण प्रदान करू शकते. चरणाऱ्या प्राण्यांना खडकांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये वसलेल्या लहान रसाळ वनस्पतींपर्यंत पोहोचणे कठीण आहे. खडक दिवसा उष्णता टिकवून ठेवतात आणि रात्री ते सोडतात. यामुळे माकडशिंगीसारख्या उष्णता-प्रेमळ वनस्पतींना अनुकूल सूक्ष्म हवामान तयार होते. खडक पाण्याचा निचरा सुधारतात आणि त्यामुळे मुळांभोवती पाणी साचत नाही. ओलसर किंवा घट्ट मातीत रसाळ वनस्पती कुजण्याची शक्यता असते.
Caralluma seeds naturally disperse through wind, gravity and potentially even with animals and water. Wind dispersal is common for light seeds. Seeds disperse as the pods open after getting dried up. Seeds are typically small, flattened and broadly margined with silky white hairs. In the wild in parts of India and deccan plateau, Caralluma naturally colonises dry stony outcrops, gravel plains, and open rocky scrublands. Most other plants struggle in rocky soil due to lack of nutritions and water. Caralluma's adaptations (succulence, water storage and CAM photosynthesis) give it competitive advantage. The rocky environment may provide physical protection from herbivores like goats or cattle. It is hard for grazing animals to access small succulents nested between or among the rocks. Rocks retain heat during the day and release it in night. This creates microclimate that favours heat loving plants like Caralluma. Rocks improve drainage preventing water from pooling around the roots, which could cause roots to rot. Succulents are prone to rot in moist or compacted soils, so rocky soil offers low moisture niche.
 

 

 
3. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
--
---
 

 

 
4. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
5. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
----
---
 

 

 
6. Anatomy of Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
7. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
8. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
9. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
10. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
11. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
12. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
13. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
14. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
15. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
16. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
17. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
18. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
19. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
20. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
21. Caralluma adscendens var. fimbriata (माकड शिंग) , Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
 
 
 
References :
1. Flowersofindia.net
2. Flowers of Sahyadri by Shrikant Ingalhalikar
3. Caralluma adscendens (Makad Shing) as a potential medicinal herb - Kumkar R. D. et al.
 
 


For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com